पुणे - कोरोनाच्या संकटात शेतकरी हतबल होत असताना अवकाळी पावसाचे नवे संकट शेतकऱ्यांच्या समोर उभे राहिले आहे. आंबेगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे अनेर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसासह गारपीट; शेतीचे नुकसान - Pune Rain News
कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच आता गारपीट आणि आवकाळी पावसाचे संकट आले आहे.
गेल्या महिन्याभरापासून कोरोनाच्या संकटाचा सामना संपूर्ण देश करत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱयांचा शेतमाल शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच आता गारपीट आणि आवकाळी पावसाचे संकट आले आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी जबाबदारी पार पाडत आहे. शेतकरीही शेतात काबाडकष्ट करतो आहे. मात्र, त्यांचा मेहनतीवर अवकाळी पावसाने पाणी फिरवले. गारपीटीने भाजीपाल्यासह,फळबागा, बाजरी आणि इतर शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.