पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये आज दुपारी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिक उकाड्याने हैराण आहेत. मात्र, आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस; नागरिकांची तारांबळ - pimpri chinchwad rain news
पिंपरी-चिंचवडमध्ये आज दुपारी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिक उकाड्याने हैराण आहेत. मात्र, आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस; नागरिकांची तारांबळ
मान्सून सक्रिय झाल्यानंतर देखील शहरात पाऊस झालेला नाही. मावळ परिसरात शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली असून मध्यमस्वरुपाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकरी सुखावलेला असून शहरावासीय मात्र आणखी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.