पुणे - चार दिवसांपासून खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्याच्या हंगामातील पिके वाढीला लागली असताना पावसाचा जोर वाढल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यात पावसाची दमदार हजेरी, शेतमालाचे नुकसान - Ambegaon Junnar Shirur latest news
पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. अवेळी झालेल्या या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
सायंकाळच्या सुमारास खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली, यावेळी ओढे-नाले दुथडी भरून वाहत होते. काही ठिकाणी शेतांना तलावाचे रूप आले आहे. शेतातून पाणी वाहत असल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. "आता नको रे बाबा तो पाऊस" असे म्हणण्याची वेळ कष्टकरी बळीराजावर आली आहे. कधीकाळी पावसाची वाट पाहणारा शेतकरी आता याच पावसाला कंटाळा आहे. मोठ्या भांडवली खर्चातुन उभारलेल्या शेतमालाचे मोठे नुकसान होताना दिसत आहे.