महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात मुसळधार पाऊस; वसाहतींमध्ये पाणी शिरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

शहरात आलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. विश्रांतवाडी येथील शांतीनगर वसाहतीत पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे या भागातील नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. त्याचबरोबर झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस

By

Published : Aug 4, 2019, 10:59 AM IST

Updated : Aug 4, 2019, 2:53 PM IST

पुणे- शहरात गेल्या पाच- सहा दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील काही वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. त्याचबरोबर, पावसामुळे काही भागातील नाले तुंडुंब भरले आहेत.

पुण्यात मुसळधार पाऊस

शहरात आलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरले. विश्रांतवाडी येथील शांतीनगर वसाहतीत पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल झाले. त्याचबरोबर झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे. तर पिंपळे निलखच्या पुलाला पाणी लागले असून बाणेरची स्मशानभूमी पूर्णपणे पाण्यात बुडाली आहे. तसेच ज्युपिटर हॉस्पिटल, प्रथमेश पार्क, डी.एस के गंधकोष सोसायटीचा नाला तुडुंब भरला आहे. पावसाचे पाणी पार्किंगमध्ये शिरले आहे.

जोरदार पावसामुळे खडकवासला धरण क्षेत्रातील पाणीसाठा ९८ टक्के इतका झाला आहे. धरणात २८.४८ टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने मुठा नदीत ११ वाजता ३५ हजार ५७४ क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. पावसामुळे शहरातील डेक्कन भिडे पूल पाण्याखाली आला आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शहर व परिसरात संततधार पाऊस सुरू आहे.

Last Updated : Aug 4, 2019, 2:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details