महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; रस्त्यांवर झाडे कोसळली,घरात पाणी शिरले - life disrupted

गेल्या २४ तासांपासून पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शहरातून जाणारी पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. तर, केजुबाई धरण देखील ओसांडून वाहत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. त्यानंतर सायंकाळी पासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.

पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले

By

Published : Jul 27, 2019, 12:57 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहराच्या सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर पावसामुळे शहरात चार ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पावसामुळे शहरातील जन जीवन ठप्प झाल्याचे दृष्य

गेल्या २४ तासात पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शहरातून जाणारी पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. तर, केजुबाई धरण देखील ओसंडून वाहत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. त्यानंतर सायंकाळीपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली. मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाले, ओढे ओसांडून वाहू लागले. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. या दरम्यान, काही भागातील विद्युत पुरवठा सुद्धा काही तासांसाठी खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

पावसामुळे शहरातील निगडी, प्राधिकरण, सांगवी आणि रहाटणी येथे झाडे कोसळण्याची घटना देखील घडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसामुळे पवना नदी दुथडी भरली असून नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. हे सर्व पाहण्यासाठी नदी काठी नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. त्याचबरोबर काही नागरिक, तरुण येथे सेल्फी सुद्धा काढताना दिसत आहेत. हे सर्व पाहता प्रशासनाकडून नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details