महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे पुण्यातील धरणं भरली; खडकवासलातून तब्बल 45300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू - water

गेल्या दोन-तीन दिवसापासून पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने जिल्हयातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. जिल्ह्यातील धरणंही 100 टक्के भरली आहेत. तर, मुठा नदीत खडकवासला धरणातून तब्बल 45 हजार 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

पुणे

By

Published : Aug 5, 2019, 10:12 AM IST

पुणे - जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून, येथील बहुतांश धरणं 100 टक्के भरली आहेत. शहरातील मुळा-मुठा नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पुण्यातील नद्यांना पूर


गेल्या दोन-तीन दिवसापासून पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने जिल्ह्यातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तर, पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणातून तब्बल 45 हजार 300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येत असून सकाळी 11 वाजता हा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. तर बंडगार्डन बंधाऱ्यातून 1 लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


मुळा, मुठा आणि पवना या नद्या पुणे शहरातून जात असल्यामुळे शहरात पूर परिस्थिती उद्भवली आहे. प्रशासनाने पुणे शहरातील अंदाजे 450 कुटुंबातील 1800 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील जुनी सांगवी, दापोडी, रहाटणी, वाकड रावेत या परिसरातील काही सोसायट्या बाधित झालेल्या आहेत. जिल्ह्यातील खडकवासला, वरसगाव, पानशेत, पवना, निरा-देवघर, चासकमान, मुळशी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details