पुणे - शहर आणि लगतच्या परिसरात बुधवारी रात्री ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जोरदार पाऊस झाला. पावसाने घातलेल्या थैमानात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 जण अद्यापही बेपत्ता आहेत. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत.
जोरदार पावसामुळे पुणेकरांची दैन्यवस्था; 11 जणांचा मृत्यू तर 4 जण बेपत्ता - पुणे पूरस्थिती
गेल्या 24 तासात शहरात तब्बल 4 ते 5 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने घातलेल्या थैमानात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 जण अद्यापही बेपत्ता आहेत. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत.
हेही वाचा -पुण्यात पुराच्या पाण्यात एकाच गोशाळेतील 35 गायींचा मृत्यू
गेल्या 24 तासात शहरात तब्बल 4 ते 5 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातून वाहणाऱ्या नदी-नाल्यांना पूर आल्याने लगतच्या बागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. शहराच्या रस्त्यावर पुराचे पाणी येऊन रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पावसात मोठ्या प्रमाणावर जीवीत व वित्त हानी झाली आहे. खासकरून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शहरातून पुरात वाहून गेलेल्या 10 पैकी आठ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर, पुण्याजवळील खेड शिवापूर येथून पुरात वाहून गेलेल्या 5 पैकी 3 जणांचे मृतदेह सापडले आहेत.