महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्याला परतीच्या पावसाने झोडपले; रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीची कोंडी

शहरातील जंगली महाराज रोड, एफ सी रोड,  प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रोड, अलका चौक, सिंहगड रोड, भांडारकर रोड परिसरात दूरपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत आणि पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले.

पुण्याला परतीच्या पावसाने झोडपले; रस्ते जलमय झाल्याने वाहतूकीची कोंडी

By

Published : Oct 9, 2019, 10:33 PM IST

पुणे -बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहरात तुफान पाऊस झाला. काही वेळ पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूकीची कोंडी झाली.

पुण्याला परतीच्या पावसाने झोडपले; रस्ते जलमय झाल्याने वाहतूकीची कोंडी

शहरातील जंगली महाराज रोड, एफ सी रोड, प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रोड, अलका चौक, सिंहगड रोड, भांडारकर रोड परिसरात दूरपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत आणि पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा -पुण्यात राज ठाकरेंच्या सभेआधी पावसाची बॅटींग.. मैदान चिखलमय

शहरातील सिंहगड रोड, टिळक रोड, सदाशिव पेठसह अनेक भाग आणि उपनगरांत वीज पुरवठाही खंडीत झाला होता. त्यामुळे पुणेकरांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. टिळक रस्त्यावर एसपी कॉलेज समोर ग्राहक पेठ येथे पीएमपीच्या बसवर झाड कोसळले. या घटनेत बस चालक अजूनही अडकला असून त्याला काढण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा -मुंबई पूर्व उपनगरात जोरदार पावसाची हजेरी

दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरात 50 हुन अधिक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. शहरात पाणी तुंबण्याला पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details