पुणे - गेल्या चार दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना आज उत्तर पुणे जिल्ह्यात वादळी वाऱयासह पावसाचे जोरदार आगमन झाले. आंबेगाव, शिरुर, खेड तालुक्यात अनेक गावांमध्ये गारांच्या पावसाने चांगलेच झोडपले, अचानक सुरु झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पुणे परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
उत्तर पुणे जिल्ह्यात दुष्काळी संकटामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे, अशात ४ दिवसांपासून पावसाची चाहुल लागली असून, वातावरणात उकाडा वाढला आहे, त्यामुळे शेतकरी आकाशाकडे पावसाची वाट पहात असताना आज वादळी वाऱयासह पावसाचे आगमन झाले.
पुणे परिसरात वादळी पाऊस

सध्या लगीन सराई जोरात सुरु असून, आंबेगाव शिरुर खेड तालुक्यात अचानक सुरु झालेल्या पावसाने लग्नकार्य मालकांसह वऱहाडी मंडळीची चांगलीच धावपळ उडाली.