महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोणावळा परिसरात पावसाची जोरदार हजेरी; इंद्रायणी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - इंद्रायणी नदी

लोणावळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. इंद्रायणी नदीला पूर आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

लोणावळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली

By

Published : Jul 30, 2019, 7:34 PM IST

पुणे - लोणावळा परिसरात पावसाची 'देर आये दुरुस्त आये' अशी परिस्थिती आहे. यावर्षी महाराष्ट्रात मान्सून उशिरा दाखल झाला. सुरूवातीला काही दिवस पाऊस झाल्यानंतर पावसाने उघड दिली होती. आता मात्र पावसाने पुन्हा जोर धरला असून, लोणावळा परिसरात पाणीच पाणी झाले आहे.

लोणावळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही सारखाच पाऊस झाला आहे. यावर्षी १ जून पासून आज पर्यंत एकूण ३२१३ मी.मी. पाऊस झाला आहे. तर याच तारखेला गेल्या वर्षी ३२४१ मी.मी. पाऊस झालेला आहे. गेल्या वर्षीच्या आणि यावर्षीच्या पावसाची तुलना केल्यास समान पाऊस झाल्याचे दिसते आहे. लोणावळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळला आहे. यामुळे लोणावळा, खंडाळा परिसरातील पर्यटन स्थळे गर्दीने फुलून गेली आहेत. गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे दळण वळण ठप्प झालेले आहे. इंद्रायणी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इंद्रायणी नदीचे पाणी अनेक गावांमध्ये शिरले आहे. मुसळधार पावसामुळे धरणे, ओढे, तलाव हे तुडूंब भरली आहेत. मावळ परिसरातील धबधबे देखील पर्यटकांना आकर्षित करूत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details