पुणे- गेल्या दोन दिवसांपासून खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर परिसरामध्ये पावसाने थैमान घातले आहे. यात शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात खेड तालुक्यातील विऱहाम गावात वादळी वाऱ्यामुळे राहत्या घराचे छत उडून गेल्याने आदिवासी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
खेड परिसरात अवकाळी पावसाचे थैमान, शेतीसह घरांचे नुकसान - खेड
सध्या निवडणुकीचे वातावरण असताना अवकाळी पावसामुळे होणारे नुसकान व त्यातून मिळणारी भरपाई याकडे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असून खेड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे.
अवकाळी पावसाचे थैमान
सध्या दुष्काळी परिस्थिती व कडाक्याचे ऊन यातून संघर्ष करत असताना शेतकरी वेटाकुटीला आला असून अचानक दोन दिवसांपासून वादळी वाऱयासह अवकाळी पावसाचे आगमन होऊ लागल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीसह घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सध्या निवडणुकीचे वातावरण असताना अवकाळी पावसामुळे होणारे नुसकान व त्यातून मिळणारी भरपाई याकडे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असून खेड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे.