पुणे -सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. त्यातच जिल्ह्यातील खेड,आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर शिवारात अवकाळी पाऊस आल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढलेली आहे.
कोरोनाच्या संकटात अवकाळी पावसाची भर; शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ - पुणे पाऊस बातमी
देशात आधीच कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू शकत नाही. त्यातच अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.

कोरोनाच्या संकटात अवकाळी पाऊस; शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ
कोरोनाच्या संकटात अवकाळी पाऊस; शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ
गहू काढणीला आला आहे, तर अन्य पीकेही बहरून आली आहेत. दरम्यान, देशात कोरोनाचे संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देश लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे घराबाहेर देखील पडता येईना. तसेच शेतातील काढणीला आलेली पिकेही शेतकरी काढू शकला नाही. त्यातच वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस आला. परिणामी संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. कोरोना आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे.
Last Updated : Mar 26, 2020, 10:02 AM IST