महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंबेगाव शिरुर तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला - shirur ambegaon

शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक भागात आज जोरदार वादळी वा-यासह वरूण राजाचे आगमन झाले. मात्र, या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी हाहाकरा माजवला. परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. दरम्यान या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

आंबेगाव शिरुर तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला

By

Published : Jun 27, 2019, 9:50 PM IST

पुणे- जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक भागात आज जोरदार वादळी वा-यासह वरूण राजाचे आगमन झाले. मात्र, या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी हाहाकरा माजवला. परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. दरम्यान या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

आंबेगाव शिरुर तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला

दुष्काळाने होरपळलेल्या, बळीराजा पावसासाठी आतूर होता. तेव्हा आज शिरुर आंबेगाव परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार सरी बरसल्याने परिसरातील रस्ते, शेती, ओढे-नाले दुखडी भरून वाहत होते. तर काही ठिकाणी अनेक घरामध्ये पाणी शिरले.

दरम्यान, या मुसळधार पावसाने बळीराजा सुखावला आहे. या पावसाने परिसरात पेरणी होईल असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details