पुणे- शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज भाजी खरेदीसाठी ग्राकांनी आणि विक्रीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. सुरुवातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होता, मात्र काही वेळात लोकांची गर्दी हाताबाहेर गेल्याने पोलिसांना बोलवावे लागले.
covid19: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी; पोलीस आल्यावर गर्दी नियंत्रित - Agricultural Produce Market pune
आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी विक्रीसाठी शेतकरी आणि व्यापारी, तसेच भाजी खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी झाली. त्यामुळे, बजार समितीतर्फे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलीस आल्यानंतर गर्दी पांगली. खबरदारी म्हणून बाजार समिती समोर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
बाजार समितीतील गर्दी
कृषी उतपन्न बाजार समितीमध्ये काल ८६७ वाहनांमधून भाजीपाला आला होता. तर, आज २ हजार ५० वाहनांमधून भाजीपाल्यांची आवक झाली आहे. आज भाजी विक्रीसाठी शेतकरी आणि व्यापारी तसेच भाजी खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी झाली. त्यामुळे, बजार समितीतर्फे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलीस आल्यानंतर गर्दी पांगली. खबरदारी म्हणून बाजार समिती समोर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.