बारामती- पुणे जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींंच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. मात्र निकालाच्या दिवसापासून ते थेट सरपंच निवडीपर्यंत इंदापूरचे विद्यमान आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील एकमेकांवरील राजकीय शाब्दिक हल्ले सुरूच आहेत.
इंदापुरात आमचेच सर्वाधिक सरपंच इंदापूर तालुक्यातील ६० पैकी ३८ ग्रामपंचायतींवर भाजपाचेच सरपंच झाल्याचा दावा भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांमुळे इंदापूर तालुक्यातील तब्बल ४२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे सरपंच निवडून आल्याचा दावा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केला आहे. भरणे आणि पाटील यांच्या दाव्यामुळे इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींपैकी नेमक्या किती ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या व किती भाजपाच्या, असा सवाल गावागावांमध्ये चर्चिला जात आहे. आता हे दोन्ही आजी-माजी मंत्री आमच्याच ग्रामपंचायती जास्त असल्याचा दावा करून, या गावांचा विकास करणार असल्याचे सांगत आहेत.
भरणे यांनी दावा केलेल्या ग्रामपंचायतीसपकळवाडी, अकोले, पोंधवडी, लोणीदेवकर, चिखली, निमगाव केतकी, निंबोडी, अंथूर्णे, रुई, बळपुडी, भांडगाव, हगारेवाडी, काटी, कळस, तरंगवाडी, तक्रारवाडी, नरसिंह पूर, लासुर्णे, शेटफळगडे, पिंपरी बुद्रुक, शहा, निमसाखर, सनसर, गोतोंडी, सराफवाडी, चांडगाव, व्याहाळी, कुंभारगाव, कळंब, पिंपळे, भरणेवाडी, चाकाटी, गिरवी, कडबनवाडी, पळसदेव, घोरपडवाडी, कचरवाडी, सरडेवाडी, कोठळी, जाचकवस्ती, जाधववाडी, भोडणी या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रावादीचा सरपंच असल्याचा दावा भरणे यांनी केला आहे.
पाटील यांनी दावा केलेल्या ग्रामपंचायती....चांडगाव, लोणीदेवकर, बळपुडी, भावडी, अकोले, शेटफळगडे, पिंपळे, निरगुडे, भिगवन, कुंभारगाव, भादलवाडी, निरवांगी, दगडवाडी, पिटकेश्वर, सराफवाडी, व्याहाळी, वरकुटे खुर्द, हगरेवाडी, गोतोंडी, निमसाखर, वालचंदनगर, कळंब, सरडेवाडी, गलांडवाडी १, गलांडवाडी २, बाभूळगाव, गोंदी, भांडगाव, नरसिंहपूर, टनु, भोडणी, कचरवाडी, पिठेवाडी, निंबोडी, तावशी, जाधववाडी, रेडा, कचरवाडी या ग्रामपंच्यातीवर भाजपाचे वर्चस्व असल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
भरणे व पाटील यांनी समानदावा केलेल्या ग्रामपंचायतीचांडगाव, लोणीदेवकर, बलपुडी, पळसदेव, अकोले, शेटफळगढे, पिंपळे, कुंभारगाव, सराफवाडी, कचरवाडी, व्याहाळी, हगारेवाडी, गोतोंडी, निमसाखर, सरडेवाडी, भांडगाव, नरसिंगपूर, भोडणी, निंबोडी, जाधवाडी.या ग्रामपंचायतीमध्ये आमचीच सत्ता असल्याचा दावा दोन्ही नेत्यांन्यी केला आहे.