महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nawab Malik : नवाब मलिक यांना भर चौकात फाशी द्या.. भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान - नवाब मलिक दाऊद संबंध

मंत्री नवाब मलिक यांनी दाऊद सारख्या देशद्रोह्याशी संबंध ठेवले ( Nawab Malik Daud Connection ) आहेत. अशा मंत्र्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे ( Hang Nawab Malik in the chowk ) असं वादग्रस्त विधान भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे ( MLA Mahesh Landage Controversial Statement ) यांनी केलं आहे.

नवाब मलिक यांना भर चौकात फाशी द्या.. भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान
नवाब मलिक यांना भर चौकात फाशी द्या.. भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान

By

Published : Feb 26, 2022, 7:13 AM IST

पिंपरी-चिंचवड : मुंबईतील बॉम्बस्फोटात हस्तक्षेप असलेल्या लोकांसोबत संबंध ठेवलेल्या या मंत्र्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे ( Hang Nawab Malik in the chowk ), असं वादग्रस्त विधान भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले ( MLA Mahesh Landage Controversial Statement ) आहे.

नवाब मलिक यांना भर चौकात फाशी द्या.. भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान

मुंबईमधील नागरिक आजही भयभीत होतात

आमदार महेश लांडगे म्हणाले की, महाविकास आघाडीतील कोणत्या ना, कोणत्या मंत्र्यांवर दररोज भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. नवाब मलिक यांच्यावर जो आरोप आहे तो या हिंदुस्थानमधील नागरिक सहन करणार नाहीत. गंभीर आरोप नवाब मलिक यांच्यावर ( Nawab Malik Daud Connection ) आहे. मुंबईमधील नागरिकांना 1993 मधील बॉम्ब स्फोटाबद्दल, जातीय दंगलीबद्दल किंबहुना दाऊद सारख्या अंडरवर्ल्ड डॉनच्या दहशतीबद्दल विचारलं तर, मुंबईमधील नागरिक आज सुद्धा भयभीत होतात. ते दृश्य त्यांना परत नकोय. अशा बॉम्ब स्फोटात सहभागी असणाऱ्या लोकांना, हात असणाऱ्या लोकांना दाऊद सारख्या एका देशद्रोह्याशी संबंध ठेवलेल्या या मंत्र्याला अटक करून चालणार नाही तर भर चौकात फाशी दिली पाहिजे, अस वक्तव्य आमदार लांडगे यांनी केलं आहे. देशद्रोही असलेल्या नवाब मलिक यांना देशातील नागरिक कधीच माफ करणार नाहीत असं देखील ते म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details