पुणे - संपूर्ण महाराष्ट्रात आज विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पुण्यात विधानसभेच्या आठ जागा आहेत आणि या आठही जागांवर सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. अनेक तरुण, वृद्ध, अपंग मतदार येऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. परंतु, यातील एका महिलेने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण या महिलेला दोन्ही हात नाहीत.
दोन्ही हात नसतानाही पुण्यातील 'या' महिलेने केले मतदान - पुणे निवडणुकीच्या बातम्या
ही महिला दोन्ही हातांनी अपंग असूनही तिने समोर येऊन मतदानाचा हक्क बजावला आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये आपले योगदान दिले.
ही महिला दोन्ही हातांनी अपंग असूनही तिने समोर येऊन मतदानाचा हक्क बजावला आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये आपले योगदान दिले. सुरेखा खुडे असे या महिलेचे नाव आहे. पर्वती मतदारसंघातील भाऊसाहेब हिरे या मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुरेखा खुडे यांना दंडापासून दोन्ही हात नाहीत. पण उजव्या हाताला असलेल्या एका बोटाला मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी शाई लावली यावेळी मतदान केंद्रावरील इतर कर्मचाऱ्यांनीही त्यांना मतदान करताना मदत केली.
यावेळी बोलताना सुरेखा कुडे म्हणाल्या "प्रत्येक मत हे अमूल्य असतं त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे" असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.