महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune crime : हॅपी न्यू इयर म्हणण्यावरुन झालेल्या वादात कुऱ्हाडीने तोडला हात - Chaturshrungi Police

दारुच्या नशेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना हॅपी न्यू इयर ( Happy new year wish ) म्हणण्यावरुन झालेल्या वादात (Hand was broken with ax ) चौघांनी एका तरुणावर कुऱ्हाडीने वार करुन मनगटापासून हात तोडला. रक्ताळलेला हात घेऊन पोलिसांनी तातडीने या तरुणाला शेजारच्या उघड्या असलेल्या दवाखान्यात नेले. उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या या दवाखान्यामधील डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवून प्राथमिक उपचार करुन त्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पाठविले. तेथे या तरुणाच्या हातावर शस्त्रक्रिया करुन हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आले.

Pune crime
हॅपी न्यू इयर म्हणण्यावरुन झालेल्या वादात कुर्हाडीने तोडला हात

By

Published : Jan 2, 2023, 12:24 PM IST

पुणे :काल सर्वत्र नववर्षाच्या स्वागत आणि एकेमकांना शुभेच्छा देण्याचा दिवस होता. (Hand was broken with ax ) जगभरात नववर्षाचे स्वागत जोरदार पद्धतीने करण्यात आले.अश्यातच पुण्यात दारुच्या नशेत येणार्या जाणार्या वाहनचालकांना हॅपी न्यू इयर म्हणण्यावरुन झालेल्या वादात चौघांनी एका तरुणावर कुऱ्हाडीने वार करुन मनगटापासून हात तोडला. ( argument over saying Happy New Year ) पंकज तांबोळी असे या तरुणाचे नाव आहे. तांबोळी हे सीडॅक ए सी टी एस या इन्सिट्युटमध्ये डॅक कोर्स करीत आहेत. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी (Chaturshrungi Police) चौघांना ताब्यात घेतले असून त्यातील तिघे अल्पवयीन आहेत. हा प्रकार साई चौकात पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडला.


शस्त्रक्रिया करुन हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश : याबाबत आशुतोष अर्जुन माने वय २४ राहणार दुर्वांकूर, पंचवटी, पाषाण यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चारही आरोपींनी पकडण्यात आले असून तीन अल्पवयीन असून गौरव गौतम मानवतकर वय 20 वर्ष राहणार शिवनगर बस स्टॉप जवळ तोंडेचाळ सुतारवाडी पाषाण पुणे असे आरोपींचे नाव आहे. हॅपी न्यू इयर म्हणण्यावरुन झालेल्या वादात चौघांनी एका तरुणावर कुऱ्हाडीने वार करुन मनगटापासून हात तोडला. तेव्हा रक्ताळलेला हात घेऊन पोलिसांनी तातडीने या तरुणाला शेजारच्या उघड्या असलेल्या दवाखान्यात नेले. उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या या दवाखान्यामधील डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवून प्राथमिक उपचार करुन त्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पाठविले. तेथे या तरुणाच्या हातावर शस्त्रक्रिया करुन हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

हातावर कुर्हाडीने वार :याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र पंकज तांबोळी, साजीद शेख हे मेस बंद असल्याने साई चौकातील ईर्षाद हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर पहाटे ते हॉटेलबाहेर उभे असताना मोटारसायकलवरुन दोघे जण आले. ते दारुच्या नशेत सर्वांना जबरदस्तीने हॅपी न्यू इयर म्हणत होते. त्यावरुन त्यांच्यात काही वाद झाला. तेव्हा त्यांच्यातील एकाने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. त्याचे साथीदार आल्यावर पुन्हा वाद झाला. तेव्हा धक्काबुक्कीत एकाने पंकज यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार केला. त्यात पंकज याचा मनगटापासून हात तुटला. पंकजचा तुटलेला हात आणि रक्त पाहून ही मुले घाबरुन पळून गेली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहचले. त्यांनी या तरुणाला जवळच उघडे असलेल्या दवाखान्यात नेले. या दवाखान्याचे येत्या दोन दिवसात उद्घाटन होणार आहे. तरी डॉ. अवधूत यांनी ते उघडे ठेवले होते. त्यांनी पंकजचा रक्ताळलेला व तुटलेला हात घेऊन तो स्वच्छ करुन एका प्लॉस्टिकच्या पिशवीत टाकून त्याला तातडीने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पाठविले. तेथील डाॅक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन तो पूर्ववत जोडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details