महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे साडेतीन वर्षीय मुलाचे कापावे लागले हात-पाय - हात

आदी असे या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील टेलरिंग काम करतात तर कात्रज परिसरातील सच्चाईनगर परिसरात भाड्याच्या घरात ते राहतात. ते ज्या घरात राहतात तेथेच भिंतीलगत विद्युत तारांचा संच आहे. या तारा उघड्याच होत्या, तर घराच्या गच्चीची भिंतीची उंची फक्त दीड ते दोन फुट आहे.

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे 'त्या' साडेतीन वर्षीय मुलाचे कापावे लागले हात आणि पाय

By

Published : May 21, 2019, 8:52 PM IST

Updated : May 21, 2019, 10:23 PM IST

पुणे- घराच्या गच्चीवर खेळत असताना विद्युत तारांशी संपर्क आल्याने साडेतीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचे दोन्ही हात व पाय कापावे लागले आहेत. ही दुदैर्वी घटना पुण्याच्या कात्रज परिसरात घडली. एमएसईबी आणि बिल्डिंग मालकाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. या मुलाच्या पालकांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे आयुष्यभर मुलाला कसे सांभाळायचे हा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे साडेतीन वर्षीय मुलाचे कापावे लागले हात-पाय

आदी असे या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील टेलरिंग काम करतात तर कात्रज परिसरातील सच्चाईनगर परिसरात भाड्याच्या घरात ते राहतात. ते ज्या घरात राहतात तेथेच भिंतीलगत विद्युत तारांचा संच आहे. या तारा उघड्याच होत्या, तर घराच्या गच्चीची भिंतीची उंची फक्त दीड ते दोन फुट आहे.

घटनेच्या दिवशी त्यांचा मुलगा आदी हा गच्चीवर खेळत होता. यावेळी त्याचा विद्युत तारांशी स्पर्श झाला. यामुळे शॉक लागून तो फेकला गेला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान डॉक्‍टर त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र, उपचारात त्याचा जीव वाचवण्यासाठी डॅाक्‍टरांना त्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय कापावे लागले आहेत.

आदीचे वडिल गणेश अनंता गायकवाड (29, रा.सच्चाईमाता नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार बिल्डींगचे घरमालक व एमएसईबीचे तत्कालीन अधिकारी घटनेला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. घरमालकाने इमारत बांधताना योग्य ती काळजी घेतली नाही. बिल्डिंग आणि तारांमध्ये केवळ एक फुटाचे अंतर आहे. बिल्डींगच्या गच्चीवरून एखाद्या व्यक्तीचा हात सहज त्या तारांपर्यंत पोहचू शकतो. बिल्डींग बांधताना लोकांच्या जीवाची कोणतीच काळजी घेतली गेली नाही. तसेच महावितरणनेही बिल्डींग बांधत असताना कोणतीही हरकत घेतली नाही.

गणेश गायकवाड यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यात आदीवर उपचार करण्यासाठी 10 लाखाहून अधिक खर्च येणार आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन गणेश गायकवाड यांनी केले आहे. 9604701644 हा गणेश यांचा मोबाईल क्रमांक आहे.

Last Updated : May 21, 2019, 10:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details