महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता केस कापणे होणार महाग... सलून व्यावसाईकांचा दरवाढीचा निर्णय - महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशन

दाढी-कटिंगसह इतर सेवांचा दर तब्बल दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाॅकडाऊन पूर्वी केस कटिंगसाठी 60 ते 80 रुपये दर होता. तो आता 100 ते 120 रुपये करण्यात आला आहे.

haircuts-are-going-be-expensive-now-fifty-percent-price-increase-in-maharastra
सलून व्यावसाईकांचा दरवाढीचा निर्णय

By

Published : Jun 1, 2020, 2:43 PM IST

पुणे- कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यात सलून, पार्लर व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक फटका भरून काढण्यासाठी आता महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना आता सलूनमध्ये अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा-शाब्बास..! लॉकडाऊनमध्ये बाप-लेकाने खोदली विहीर, पाणी प्रश्न कायमचा मिटवला

दाढी-कटिंगसह इतर सेवांचा दर तब्बल दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाॅकडाऊन पूर्वी केस कटिंगसाठी 60 ते 80 रुपये दर होता. तो आता 100 ते 120 रुपये करण्यात आला आहे. तर दाढी पूर्वी 40 ते 50 रुपयांमध्ये व्हायची. आता त्यासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून व्यवसायिकांकडून खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पीपीई किटसह इतर साहित्य खरेदी करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांचा खर्च वाढणार आहे. त्याच बरोबर दुकान भाडे, लाईट बिल आणि घर खर्च संभाळण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. या संघटनेचे राज्यभरात सभासद असून साधारण पुण्यात 15 हजार सलून दुकान आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details