महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Asim Sarode On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते; जाणून घ्या, कसे?

राज्यातील सत्तासंघर्षावर आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून, त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांवर सोपवण्यात आला आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी फ्लोअर टेस्टला सामोरे न जाता राजीनामा दिला. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याबाबत घटनातज्ज्ञ असीम सरोदे यांनी मत व्यक्त केले आहे.

By

Published : May 11, 2023, 4:55 PM IST

Updated : May 11, 2023, 7:41 PM IST

Asim Sarode
Asim Sarode

असीम सरोदे यांची प्रतिक्रिया

पुणे :संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या राज्यातील सत्तासंघर्षवर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय दिला आहे. यावर घटना तज्ञ असीम सरोदे यांनी आपल मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला उद्धव ठाकरेंनी घेतला असता तर आज ते पुन्हा मुख्यमंत्री झाले असते, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला घेतला असता तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते - आसीम सरोदे

पात्र, अपात्रतेचा नवीन खेळ :न्यायालयाच्या आजच्या निकालाबाबत सरोदे म्हणाले की आजचा निर्णय हा अत्यंत संतुलित असून जेव्हा न्यायालयच कामकाज सुरू होता. तेव्हा अस वाटत होत की काही न्यायमूर्ती हे वेगळा निर्णय घेतील पण आजचा निर्णय हा एकमताने घेण्यात आला आहे. शिवसेनेच्या प्रतोत बाबतचा निर्णय तसेच राज्यपाल यांनी घेतलेले निर्णय हे पूर्णपणे चुकीचे होते. हे आज जे न्यायालयाने नोंदविले आहे. ते खूप महत्त्वाचे आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यांबाबत जो विधानसभा अध्यक्षांना अधिकार दिला आहे. त्यात जर आपण पाहिलं तर आत्ता अपात्रतेचा आकडा हा येणाऱ्या काळात विधानसभेत वाढणार आहे. पात्र अपात्रतेचा नवीन खेळ आत्ता विधानसभेत येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे, असे यावेळी सरोदे म्हणाले.

धणुष्यबान परत उद्धव ठाकरेंकडे? :आजचा निर्णय पाहता निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना जो पक्षाचा चिन्ह आणि नाव दिले आहे, ते धोक्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा आत्ता पक्षाचा नाव, चिन्हाच्या याला होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिलेला निर्णय आता अयोग्य ठरण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे आत्ता पुन्हा एकदा पक्ष, चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊ शकते. कारण आज याबाबत न्यायालयाने ताशेरे हे ओढलेले आहे. म्हणून ते प्रकरणावर यांच जास्त परिणाम होणार आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय हा बदलला जाऊ शकतो असे देखील यावेळी सरोदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंना सहानभुती :राज्यातील सत्ता संघर्षाच्या पहिल्या दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय होत आहे, असे दाखवल जात आहे. त्यामुळे त्यांना पहिल्या दिवसापासून सहानभुती मिळत आहे. आजचा निर्णय पाहिला तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना सहानभूती ही मिळणार आहे. कारण ज्या पद्धतीने आज न्यायालयाने प्रतोद तसेच राज्यपाल यांच्याबाबत ताशेरे ओढले आहे. ते पाहता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना सहानभुती मिळणार असल्याचं यावेळी सरोदे म्हणाले.

  1. Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांसह निवडणूक आयोगाला फटकारले, शिंदे-फडणवीस सरकार वाचले!
  2. SC on Governor Floor Test Call : राज्यपालांचा फ्लोअर टेस्ट बोलावण्याचा निर्णय अवैध; सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
  3. Cabinet expansion : सुप्रीम निरीक्षणानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा, बच्चू कडू संजय शिरसाटांसह इतरांच्या आशा पल्लवीत
Last Updated : May 11, 2023, 7:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details