दौंड (पुणे)-अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवर पोलिसांनी कारवाई केली. यात 22.27 लाखांच्या गुटख्यासह 32.27 लाखांचा माल जप्त केला आहे .
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा वाहतूक...पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
याबाबत मानसिंग खुदहरणसिंग कुशवाहा (वय 50 रा.गाझीपुर उत्तर प्रदेश) आणि शीलदेव कृष्ण रेड्डी (राहणार सिकंदराबाद, हैदराबाद, तेलंगणा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा वाहतूक...
पुणे ग्रामीण पोलिसांनी पाटस टोलनाका येथे आयशर टेम्पो ताब्यात घेत गुटख्यावर 14 एप्रिल रात्रीच्या वेळी कारवाई केली आहे. याबाबत दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सिकंदराबाद (तेलंगणा) येथून पुण्याच्या दिशेने हा आयशर टेम्पो निघाला होता. टेम्पोच्या काचेवर अत्यावश्यक सेवा असा छापील बोर्ड लावला होता.हा टेम्पो तेलंगणा येथून 540 किलोमीटर प्रवास करून पाटसपर्यंत आला होता. या कालावधी दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात नाकाबंदीसाठी असलेल्या पोलिसांना चुकीची माहिती देऊन फसवणूक करून एवढे मोठे अंतर पार करून आला आहे. सदर आरोपींनी या वाहनाचा शासनाचा ऑनलाईन पाससुद्धा प्राप्त करून घेतला होता. याबाबत मानसिंग खुदहरणसिंग कुशवाहा (वय 50 रा.गाझीपूर उत्तर प्रदेश) आणि शीलदेव कृष्ण रेड्डी (रा. सिकंदराबाद, हैदराबाद, तेलंगणा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 22 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा गुटखा आणि 10 लाख रुपये किमतीची आयशर टेम्पो (टी एस - 10 , युए 6081 ) असा एकूण 32 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींविरोधात अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्याखालील नियम 2011 अंतर्गत कलम 26(1) 26(2), 27(1)(2)(3),30(2)(a) भा द वि 420, 34, 177, 269, 270, 272, 273,188 साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 कलम 2,3,4 या प्रमाणे यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक रमेश मोरे तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, रामदास घाडगे , पोलीस जवान संपत खबाले, रमेश कदम, जितेंद्र पानसरे, अजित काळे, प्रशांत कर्णवर यांनी केली आहे .या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सोमनाथ वाघमोडे करत आहेत.