महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परतीचा पावसाचा फळांना फटका; पेरूंच्या झाडांना रोगराईने वेढले, खराब होण्याच्या मार्गावर

मागील महिन्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला होता. त्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये झाडाला लागलेली पेरूची फळे गळून पडली तर, काही प्रमाणात फळांवर रोगराई पसरली होती. त्यामुळे, आता पेरूची झाडे खराब होऊ लागली आहेत.

pune
परतीचा पावसाचा फळांना फटका

By

Published : Dec 7, 2019, 4:12 PM IST

पुणे- आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यात परतीचा पाऊस व सध्याच्या थंडीमुळे जिल्ह्यातील पेरूच्या फळबागा अडचणीत आल्या आहेत. रांजणगाव येथील ५ एकर शेतीतील पेरू गळून पडत आहे. सोबतच हिरवीगार पेरूंची झाडे पिवळी पडू लागली आहे.

परतीचा पावसाचा फळांना फटका

मागील महिन्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला होता. त्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये झाडाला लागलेली पेरूची फळे गळून पडली तर, काही प्रमाणात फळांवर रोगराई पसरली होती. त्यामुळे, आता पेरूची झाडे खराब होऊ लागली आहेत. मोठ्या भांडवली खर्चातून उभे केलेल्या या फळबागेचे प्रचंड नुकसान होत आहे. थंडीच्या दिवसात पेरूच्या झाडाला मोठ्या संख्येने पेरू लागले आहेत. मात्र, या पेरूंवर काळया रंगाचे डाग पडून रोगाने बाधित झाले आहे. रोगाने बाधित झालेल्या या पेरुंना योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे, फळबाग शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

हेही वाचा-पंतप्रधान मोदी आज पुण्यात; पोलीस महासंचालक परिषदेला राहणार उपस्थित

ABOUT THE AUTHOR

...view details