पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात दोन आठवड्यांची वाढ केली. तर, पुण्याची परिस्थीती बघता येथीलअतिसंक्रमणशील भागात अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, यामध्ये तीन दिवसानंतर दुकाने सुरू झाल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील परिस्थिती जैसे थे.. मात्र रस्त्यांवर नागरिकांची गर्दी - corona update pune
मागील 3 दिवस दूधविक्री सोडून इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद आहेत. तसेच आजपासून प्रतिबंधित क्षेत्रात यापूर्वी निर्देशित केल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू व सेवा यांची विक्रीकेंद्र सकाळी 10 ते 2 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात तीन दिवसानंतर दुकाने सुरू झाल्याने, आज सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती भागातील दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळाली.
कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 3.0 साठी पुणे पोलीस आयुक्तालयाने नवीन आदेश काढले आहेत. त्यानुसार यापूर्वीच्या आदेशांना 17 मेच्या मध्यरात्रीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याखेरीज शहरातील 23 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अतिसंक्रमणशील भागात अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, अस असतानाही मागील 3 दिवस दूधविक्री सोडून इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद आहेत. तसेच आजपासून प्रतिबंधित क्षेत्रात यापूर्वी निर्देशित केल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू व सेवा यांची विक्रीकेंद्र सकाळी 10 ते 2 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात तीन दिवसानंतर दुकाने सुरू झाल्याने, आज सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती भागातील दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. तसेच या प्रतिबंधित क्षेत्रात यापूर्वी अंमलात असलेले अतिरिक्त निर्बंध कायम राहणार आहे.
शहरातील मध्यवर्ती पेठा प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने इथे कोणतीही सूट देण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाने दिलेल्या वेळेवरच खरेदी करता येणार आहे. तीन दिवसानंतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू केल्याने सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती.