पुणे -खेड,आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील ग्रामीण आदिवासी गावं, वाड्या-वस्त्यांवरील दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. दैनंदिन गरजेचा किराणामाल विकणाऱ्या बहुतांशी छोट्या दुकानदारांकडे 'शॉप अॅक्ट लायसन्स' नसल्यामुळे शहरीभागातून होलसेल मालाची खरेदी करण्यासाठी वाहनपरवाना मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी केली आहे.
पुण्यातील ग्रामीण व आदिवासी भागात किराणामालाचा तुटवडा; उपाययोजना करण्याची मागणी - पुणे आदिवासी भाग
पुणे-मुंबई परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खेड, आंबेगाव, जुन्नर या आदिवासी नागरिक असलेल्या तालुक्यात लॉकडाऊन कडक केले आहे. वाहतूकसेवा पुर्णपणे बंद करण्यात आल्याने त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर होऊ लागला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुणे-मुंबई परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खेड, आंबेगाव, जुन्नर या आदिवासी नागरिक असलेल्या तालुक्यात लॉकडाऊन कडक केले आहे. वाहतूकसेवा पुर्णपणे बंद करण्यात आल्याने त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर होऊ लागला आहे.
लॉकडाऊन होऊन 15 दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील दुकानात असलेला किराणा व जीवनावश्यक वस्तुंचा सगळा साठा संपला आहे. ग्रामीण भागातील छोट्या दुकानदारांना आपल्या दुकानात नागरीकांना विक्रीसाठी माल उपलब्ध ठेवण्यासाठी, मालाची खरेदी आणि वाहतूक करण्यासाठी परवानगी मिळायला पाहिजे. मात्र, लॉकडाऊनच्या नियमावलीनुसार परवानगी नाकारली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक बाहेर पडून शहरीभागात गर्दी करण्याची भिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी व्यक्त केली आहे.