महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेष्ठ नागरिकांना घरपोच किराणामाल अन् औषधे; बांधकाम व्यावसायिक विशाल गोखलेंचा उपक्रम - पुणे कोरोना व्हायरस बातमी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या देशभरातील लॉकडाऊनच्या परिस्थितीत विशाल गोखले यांनी मदत करण्याच ठरवले आहे. यासाठी शहराच्या प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, डेक्कन, कर्वेनगर, पटवर्धन बाग, मयुर, आयडियल, डहाणूकर, रामबाग कॉलनी या भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष हेल्पलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे.

groceries-and-medicines-at-home-for-senior-citizens-in-pune
जेष्ठ नागरिकांना घरपोच किराणामाल अन् औषधे

By

Published : Apr 2, 2020, 12:42 PM IST

पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेव वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांचा मदतीचा हात दिला आहे. गोखले हे ज्येष्ठांना घरपोच मोफत किराणा आणि औषधे देणार आहेत.

जेष्ठ नागरिकांना घरपोच किराणामाल अन् औषधे

हेही वाचा-धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या देशभरातील लॉकडाऊनच्या परिस्थितीत विशाल गोखले यांनी मदत करण्याच ठरवले आहे. यासाठी शहराच्या प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, डेक्कन, कर्वेनगर, पटवर्धन बाग, मयूर, आयडियल, डहाणूकर, रामबाग कॉलनी या भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष हेल्पलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर संपर्क केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक किराणामाल व अत्यावश्यक औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ही सेवा ज्येष्ठ नागरिकांना मोफत व घरपोच मिळणार आहे. ही सेवा हवी असल्यास नागरिकांनी सकाळी 10 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेत संपर्क करायचा आहे.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारून लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details