पिंपरी चिंचवड (पुणे)100th Natya Sammelan :नाट्य संमेलनात हस्तांतरण सोहळा झाल्यानंतर मुख्य सभामंडपात झालेल्या या संगीत रजनीला नाट्य संमेलनाचे (End of Natya Samamel) आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, युवा उद्योजक हर्षवर्धन भोईर आदि उपस्थित होते. (Mugdha Karhade)
'या'गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं :अवधूत गुप्ते संगीत रजनीची सुरुवात पार्श्वगायिका मुग्धा कऱ्हाडे हिच्या 'ही गुलाबी हवा' या गाण्याने झाली. प्रेक्षकांना मुग्धाच्या सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध केलं. पुढे लिटिल चॅम्प फेम कौस्तुभ गायकवाडने 'राधा ही बावरी' हे गाणं सादर करत रसिकांची मनं जिंकली. त्या नंतर गायिका मानसी घुले-भोईर यांनी 'आता गं बया का बावरलं' आणि सार्थक भोसलेच्या साथीने 'बहरला हा मधुमास नवा' हे गाणे सादर करत आपल्या आवाजाची जादू उपस्थित प्रेक्षकांना दाखवत त्यांची मनं जिंकली.
या गाण्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद :अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार आणि पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी 'गणाधीश' या गाण्यातून श्री गणरायाला वंदन करत आपल्या गायनाची सुरुवात केली. पुढे त्यांचे गाजलेले 'तुझे देख के मेरी मधूबाला', 'सखे तुझ्या नावाचं गं वेड लागलं' ही गीतं सादर करत वातावरणात जोश निर्माण केला. त्यांनी 'काय सांगू राणी मला गाव सुटना' म्हणताच पिंपरी चिंचवडकरांनी एकच जल्लोष करत त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी अभिनेता प्रतीक लाड, गौरव मोरे, अभिनेत्री जुई आणि दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी एन्ट्री करत गाण्यात रंगत भरली. पुढे अवधूत आणि मुग्धा यांनी 'उन उन व्हटातून' हे गाणं सादर केलं. या बहारदार संगीत रजनीचे निवेदन अभिनेता पुष्कर श्रोत्री यानं केलं.