महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime News : दशक्रिया विधीचे बॅनर लावलेल्याचा भलताच प्रताप प्रेयसीच्या नादात केला तिसऱ्याचा खून - fact happened through love relationship

दशक्रिया विधीचे बॅनर लागलेल्या एका 58 वर्षीय आजोबाचा (Grandfather Placing Banner of Dashkriya vidhi ) भलताच प्रताप समोर आला आहे. प्रेयसी सोबत दुर जाऊन राहण्यासाठी त्यांनी एका तिसऱ्याचाच खून (Killing Another for Beloved) केल्याचा प्रकार समोर ( Grandfather created fake seen ) आला आहे. ते फरार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या ( police arrested) आहेत.

Grandfather Placing Banner
दशक्रिया विधीचे बॅनर

By

Published : Dec 28, 2022, 5:24 PM IST

Updated : Dec 28, 2022, 7:36 PM IST

पुणे :एका ५8 वर्षीय आजोबाने प्रेयसी सोबत दुर जाऊन राहण्यासाठी एका ४८ वर्षीय वयाच्या व्यक्तीचा खून करून त्याचे डोके धडापासून वेगळे ( Head separated from body ) केले त्या मृतदेहाला स्वतःचे कपडे घालून तो पसार झाला. एका महिलेशी असलेल्या प्रेम संबंधातून हा प्रकार घडल्याचे समोर (fact happened through love relationship) आले आहे. हा आरोपी फरार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

प्रेयसी सोबत राहण्यासाठी: रवींद्र भिमाजी घेनंद वय ४८, राहणार धानोरे, तालुका खेड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे वय ६५, राहणार चाऱ्होली खुर्द, तालुका खेड याला अटक करण्यात आली आहे. निखिल रवींद्र घेनंद वय २८ यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. ही घटना १६ डिसेंबर रोजी रात्री घडली होती. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी सुभाष थोरवे याचे स्वतःचे शेत आहे. रवींद्र घेनंद आणि त्याची चांगली ओळख होती. तसेच आरोपीचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. त्या महीलेसोबत लांब कुठे तरी जाऊन राहायचे होते.

स्वतःचा मृत्यूचा बनाव : त्यामुळे त्याने स्वतःचा मृत्यूचा बनाव रचण्यासाठी त्याने घेनंद यांना गोड बोलून शेतामध्ये नेले. त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करत मानेपासून डोके वेगळे करून त्यांचा खून केला. त्यानंतर, स्वतःच्या अंगावरील कपडे घेनंद यांच्या मृतदेहावर घालून त्यांना रोलरमध्ये घालून फिरवले आणि अपघाताचा तसेच स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. (fake seen of his death in love affair) एवढेच नाही तर खून करण्यासाठी जे साहित्य वापरले ते नष्ट करून खुनाचा पुरावा देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

कपड्यावरुन कुटुंबियांनी ओळखले : त्यानंतर थोरवे कुटूंबियांनी त्यांचा मृतदेह शेत्तात पाहिला तेव्हा त्याचा देहाला मुंडके नव्हते मात्र कपडे थोरवे यांचेच होते. त्यावरून थोरवे कुटुंबीयांनी हा मृतदेह थोरवे यांचा असल्याचे मान्य केले. एवढेच नाही त्यांचा दहाव्याचा कार्यक्रमही त्यांनी गावात घातला. मात्र पोलिस तपासात हा आरोपी पोलिसांना दुसऱ्या गावात सापडला. तो थोरवे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. आळंदी पोलिसांकडून संबधित आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

प्रेमासाठी काय पण:पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणत वाढली आहे. शहर तसेच ग्रामीण भागात देखील गुन्हेगारीचे स्वरूप वाढत आहे. आळंदी परिसरात असणाऱ्या चऱ्होली भागात धक्कादायक घटना घडली. प्रेमासाठी कोण काय करेल याच नेम नसतो. एका 58 वर्षीय आजोबाने चक्क प्रेमासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत स्वतःच्याच ओळखीच्या व्यक्तीचे खून करत प्रेयसी सोबत दुर जाऊन राहण्याचे नियोजन केले मात्र पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अटक झाली. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा आहे.

Last Updated : Dec 28, 2022, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details