महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 13, 2021, 7:46 AM IST

ETV Bharat / state

डिंभे कालव्यात बुडून आजोबा-नातीचा मृत्यू

डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात चास येथे शेताच्या बाजूला खेळत असताना, आठ वर्षीय मुलगी पाय घसरुन कालव्याच्या पाण्यात पडल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कालव्यात पडलेल्या चिमुकलीला वाचविण्यासाठी आजोबांनी पाण्यात उडी मारली. मात्र दोघांचाही पाण्यात बुडून दुदैवी मृत्यु झाला.

grandfather and granddaughter drowned in Dimba canal at pune
डिंभे कालव्यात बडून आजोबा-नातीचा मृत्यू

आंबेगाव (पुणे) -डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात चास येथे शेताच्या बाजूला खेळत असताना, आठ वर्षीय मुलगी पाय घसरुन कालव्याच्या पाण्यात पडल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कालव्यात पडलेल्या चिमुकलीला वाचविण्यासाठी आजोबांनी पाण्यात उडी मारली. मात्र दोघांचाही पाण्यात बुडून दुदैवी मृत्यु झाला. सदाशिव शेगर (वय 65), अन्विता शेगर (वय 8) असे पाण्यात बुडून मृत्यु झालेल्या आजोबा-नातीचे नाव आहे.

आंबेगाव तालुक्यातील चास शेगरमळा येथे डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यालगत शेगर यांची शेती आहे. याच शेतामध्ये आजोबा सदाशिव शेगर यांच्यासोबत नात आन्विता शेतात आली होती. सायंकाळच्या सुमारास अन्विता शेतीलगत कालव्याच्या बाजूला खेळत असताना आन्विताचा पाय घसरुन पाण्यात पडली. त्यावेळी आजोबांनी आपल्या नातीला वाचविण्यासाठी थेट कालव्याच्या वाहत्या पाण्यात उडी मारली. मात्र पाण्याला वेग जास्त असल्याने यावेळी दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यु झाला. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details