महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंचर येथे भव्य कृषी प्रदर्शन; शेतकऱ्यांना मिळत आहे नवनवीन तंत्रज्ञानाची महिती - Manchar Pune

मंचर येथील कृषी प्रदर्शनात १५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची दालने उभारण्यात आली. यात महिलांना गृह वस्तू खरेदी केंद्र, कृषी उद्योजक, व्यावसायिक आणि युवा शेतकरी यांना दिशा देणारे दालन फायदेशीर ठरत आहे.

pune
मंचर येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनीचे दृश्य

By

Published : Jan 27, 2020, 7:29 PM IST

पुणे- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीची संकल्पना सहज उपलब्ध व्हावी यासाठी मंचर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खेड आंबेगाव जुन्नर, शिरूर परिसरातील शेतकरी, महिला बचत गट आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे.

मंचर येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनीचे दृश्य

मंचर येथील कृषी प्रदर्शनात १५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची दालने उभारण्यात आली. यात महिलांना गृह वस्तू खरेदी केंद्र, कृषी उद्योजक, व्यावसायिक आणि युवा शेतकरी यांना दिशा देणारे दालन फायदेशीर ठरत आहे. या प्रदर्शनीत शेतकऱ्यांना शेती संबधी नवनवीन प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखविले जात आहे. शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करीत असतो. असे प्रयोग अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे येतात. त्यामुळे, कृषी प्रदर्शने शेतीसाठी नक्कीच पूरक आहेत. नवीन बी-बियाणे कसे वापरले पाहिजे, शेती कशी केली पाहिजे, रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादन वाढविण्यासाठीचे योग्य मार्गदर्शन या कृषी प्रदर्शनात मिळत आहे. त्यामुळे, हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

हेही वाचा-चोरांची करामत.. एटीएममधील 8 लाखांच्या नोटा जळून खाक

ABOUT THE AUTHOR

...view details