पुणे - बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायत सदस्य अनिल गवळी यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. तसेच त्यांनी ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवला.
बारामतीत ग्रामपंचायत सदस्य चढला टॉवरवर... विविध मागण्यांसाठी उपोषण!
गवळी यांनी मागील काही दिवसात वारंवार प्रशासनाकडे गावठाणातील अतिक्रमणे काढणे, ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची चौकशी करणे, घरकुला संदर्भात शासनाची फसवणूक केल्याबाबत, शासकीय कामाचे फलक लावण्याबाबत, ग्रामसेवकाची बदली करणे, आधी मागण्यांसंदर्भात तक्रारी केल्या होत्या. याकडे दुर्लक्ष होत असल्याने ते आक्रमक झाले आहेत.
आज सकाळपासूनच गवळी यांनी गावातील टॉवरवर चढून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल भानुदास गवळी यांनी गावठाणातील अतिक्रमणे काढण्यासोबतच घरकुल योजनेत शासनाची फसवणूक केल्याबाबत वारंवार ग्रामपंचायत व प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.