पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच रुग्णालयातील पदवीधारक आणि पदव्युत्तर डॉक्टरांनी वेतनवाढीसाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले आहे.
महानगरपालिकेच्या रुग्णलयात पदवीधारक आणि पदव्युत्तर असे ४० ते ४५ डॉक्टर अधिकारी काम करत आहेत. करोनच्या संकटात पण खांद्याला खांदा लावून हे सर्व आपलं कर्तव्य बजावत आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाने या डॉक्टरांची वेतनवाढ करावी असे सांगूनही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही वेतनवाढ करत नसल्याचा आरोप वैद्यकीय अधिकारी यशवंत इंगळे यांनी केला आहे.
वेतनवाढीसाठी पदवीधारकसह पदव्युत्तर डॉक्टरांचे काळ्या फिती लावून आंदोलन - वेतनवाढीसाठी पदवीधारक डॉक्टरांचे आंदोलन
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच रुग्णालयातील पदवीधारक आणि पदव्युत्तर डॉक्टरांनी वेतनवाढीसाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले आहे.
वेतनवाढीसाठी पदवीधारक आणि पदव्युत्तर डॉक्टरांचे आंदोलन
अनेकवेळा महानगरपालिकेला पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करत असल्याचे डॉ. इंगळे म्हणाले. कोरोनाच्या संकटात कर्तव्य बजावत असून, कामावर परिणाम न होऊ देता काळ्या फिती लावून काम करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
Last Updated : Jun 15, 2020, 6:54 PM IST