पुणेGovindgiri Maharaj on Ram Temple : पुण्यात आज 'दो धागे श्री राम के लिए' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाच्या भाषणात गोविंद गिरीदेव महाराज यांनी बोलताना एक भीती व्यक्त केली आहे. गोविंद गिरीदेव महाराज (Govindgiri Dev Maharaj) म्हणाले की, भव्य असे राम मंदिर (Ram Temple) उभा करत आहोत. परंतु, राम मंदिर फक्त उभे करून चालणार नाही. तर रामाचं कार्य आणि राम मंदिराचं अस्तित्व कायम टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना काम करावं लागणार आहे.
केवळ रामाचं मंदिर उभा करून चालणार नाही : यापूर्वी हजारो वर्षांपूर्वी आपली मंदिरे पाडण्यात आली. सातत्याने ही मंदिरं काही वर्षांनी पाडण्यात येतात का? उद्ध्वस्त का होतात. याची कारण मीमांसा करावी लागेल. रामाची प्रतिष्ठापना करून आणि मंदिर पूर्ण बांधून चालणार नाही अशा पद्धतीची मंदिरं पुन्हा पुन्हा का तोडली गेली? का उद्ध्वस्त केली गेली याची कारण मीमांसा होणे आवश्यक आहे. हे मंदिर (अयोध्येतील राम मंदिर) (Ayodhya Ram Temple) जेव्हा उभे होत आहे त्याच वेळेला अनेक लोकांचे मनसुबे असे आहेत की, मंदिर उभे तर होऊ द्या. ज्याप्रमाणे जुनी मंदिरं नेस्तनाबूत झाली तशाच प्रकारचं काहीतरी याही मंदिराकरता करावं. अशा प्रकारची टुकडे टूकडे गॅंगची किंवा अशी मनोवृत्ती असलेली काही मंडळी आहेत. त्या सर्वांना जरब निर्माण करण्याकरता केवळ रामाचं मंदिर उभा करून चालणार नाही तर, समर्थ राष्ट्र मंदिर उभा करण्याची गरज आहे. हे राष्ट्र बलशाली झालं पाहिजे. असं गोविंद गिरीदेव महाराज म्हणाले.