महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहीहंडीवर कोरोनाचे सावट.. अटी-शर्थीसह परवानगी देण्याची गोविंदा पथकांची मागणी - कृष्ण जन्माष्टमी

यावर्षी दहीहंडी सारख्या सणावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचे नियम लक्षात ठेवून कोरोना लसींचे दोन डोस पूर्ण झालेल्या गोविंदांनी एकत्र येऊन सरावाच्या ठिकाणी दहीहंडी साजरी करावी आणि यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

dahihandi celebration
dahihandi celebration

By

Published : Aug 30, 2021, 7:49 PM IST

Updated : Sep 18, 2021, 4:19 PM IST

पुणे -कृष्णाला लहानपणी दही, दूध, तूप व लोणी या पदार्थांची खूप आवड होती. कृष्णापासून चोरून यशोदा माता दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्क्यावर ठेवत असे. परंतु कृष्ण दह्याची हंडी मिळवण्यात यशस्वी होत आसे. त्याचे मित्र त्याला ही दह्याची हंडी मिळवण्यासाठी मदत करत असत. त्याचे प्रतीक म्हणून दरवर्षी गोकुळाष्टमी नंतर दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

यावर्षी दहीहंडी सारख्या सणावर कोरोनाचे सावट आहे. दहीहंडी हा एक प्रकारचा पारंपारिक खेळ असून दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज असतात त्यामध्ये अनेक गोविंदा मिळून एक पथक तयार होते आणि हे सर्व गोविंदा दहीहंडी फोडण्यात मदत करतात. मात्र कोरोनाचे सावट लक्षात घेता यावर्षीही दहीहंडीला महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी आहे. याबाबत आपण कसबा पेठमधील शिवतेज गोविंदा पथकाचे कार्यकर्ते यांच्याशी बातचीत केली आहे.

कोरोनाचे नियम लक्षात ठेवून कोरोना लसींचे दोन डोस पूर्ण झालेल्या गोविंदांनी एकत्र येऊन सरावाच्या ठिकाणी दहीहंडी साजरी करावी आणि यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

Last Updated : Sep 18, 2021, 4:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details