महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बँक शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर सरकार गंभीर निर्णय घेईल'

बँकेने शेतकरी खातेदाराला त्रास दिल्यास, सरकार गंभीर निर्णय घेईल, असे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ करण्यात आला, याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

shinde
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Jan 5, 2020, 7:44 PM IST

पुणे -मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना सुरक्षा रक्षकांनी रोखले होते. या शेतकऱ्याला बँकेने विनाकारण त्रास दिल्यची तक्रार त्याने केली होती. संबंधित शेतकऱ्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. बँकेने शेतकरी खातेदाराला त्रास दिल्यास, सरकार गंभीर निर्णय घेईल, असे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांनी आज (5 जानेवारी) भूमिगत मेट्रोच्या कामासाठी नव्याने आलेल्या टीबीएम टनेल बोरिंग मशीनची पाहणी केली. त्यांच्याच हस्ते मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभही करण्यात आला, याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे

हेही वाचा -'अब्दुल सत्तारांविषयी अफवा पसरवून विरोधी पक्ष गुंतागुंत निर्माण करण्याच्या प्रयत्नात'

एकनाथ शिंदे म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांना दोन लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी दोन दिवसांपूर्वीच बैठक पार पडली आहे. या बैठकीत संबंधित बँका, अधिकारी यांना कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत"

ABOUT THE AUTHOR

...view details