पुणे -कोरोनावरील लस कोवॅक्सिनच्या उत्पादनासाठी भारत बायोटेकच्या प्लान्टला पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्घाटन अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते.
भारत बायोटेक कंपनीने पुण्यातील मांजरी परिसरात असलेल्या 12 हेक्टर जागेवरील पूर्णपणे यंत्रणा कार्यान्वित असलेल्या इंटरव्हिट इंडिया प्रा. लि. कंपनीचा प्लांट हस्तांतरित केला होता. मात्र, त्यात अडचणी आल्याने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण गेले होते. याबाबत सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भारत बायोटेकला लस उत्पादन करण्यासाठी जमीन देण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याचे स्पष्ट केले.