पुणे - मागील अडीच महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा अक्षरशः खाली होत आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र ऑईल कंपन्या मोठ्या नफ्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशातील प्रमुख तीनही ऑईल कंपन्यांनी कमावलेला नफा आश्चर्यकारक आहे, सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी याबाबतची आकडेवारी समोर आणली आहे.
आधीच्या वर्षापेक्षा 1 हजार 600 टक्के नफा जास्त कमावला
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षापेक्षा 1 हजार 600 टक्के नफा जास्त कमावला आणि भागधारकांना 120 टक्के लाभांशही दिला आहे. बीपीसीएल या कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षीच्या पेक्षा 610 टक्के नफा जास्त कमावला आणि भागधारकांना 790 टक्के लाभांशही दिला. एचपीसीएल या कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षीच्या पेक्षा 300 टक्के नफा जास्त कमावला आणि भागधारकांना 227.5 टक्के लाभांशही दिला.
ऑइल कंपन्या तुपाशी
कोरोनाकाळात बाकी बहुतांश क्षेत्रातील कंपन्यांची स्थिती खालावली आहे. ऑइल कंपन्या घवघवीत नफा कमावून लाभांशवर खर्च करत आहेत. यावरुन या कंपन्या तुपाशी असल्याचे स्पष्ट दिसते. या कंपन्यांचे बहुतांश शेअर्स केंद्र सरकारच्या मालकीचे असल्याने लाभांशाचा सर्वाधिक लाभ त्यांनाच मिळत असल्याने तेही खूश आहेत. अर्थात हे सर्व ज्या सामान्य माणसाच्या जिवावर चालले आहे. तो मात्र निमूटपणे वाढत्या किमतीचे चटके सोसत आहे. एका बाजूला केंद्र व राज्य सरकार भरमसाठ कर लावते, तर दुसरीकडे ऑईल कंपन्या भरमसाठ नफा कमावत आहे. कोरोनामुळे मेटाकुटीला आलेली जनता मात्र रोज होणारी दरवाढ असहाय्यपणे सोसत आहे, असेही यावेळी वेलणकर यांनी सांगितले.
केंद्राने या कंपन्यांवर निर्बंध आणले पाहिजे