पुणे -प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानात शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी वीरमाता व वीरपत्नींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण - ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलिसांचाही सन्मान केला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक एस चोक्कलिंगम, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, मुख्यमंत्री महोदयांचे आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -72 Republic Day Celebration: राजधानी दिल्लीत राजपथवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा