बारामती -महाराष्ट्राचे पंढरीचा पांडूरंग हे आराध्य दैवत आहे. पायी वारी म्हणजे वारकऱ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. वारीची गेल्या हजारो वर्षांची परंपरा आहे. कोविडचे सर्व नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पायी वारीला परवानगी द्या, अशी मागणी सरकारकडे वारकरी करत आहेत. मात्र, शासन बैठका घेत त्यांना झुलवत ठेवत आहे. बार, ममालकांचे धंदे सुरू करताना सरकारने अशा बैठका घेतल्या होत्या का? हे वसूली सरकार महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी व हिंदू सण-समारंभावेळीच कोरोनाचे निमित्त काढते. औरंगजेबाच्या काळात संभाजी महाराजांनी वारीला संरक्षण दिले होते. मग छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे नाव घेवून हे सरकार औरंगजेबासारखे काम का करतय? बहुजनांच्या भावनांच्या विरोधात जात सरकारने पायी सोहळ्याला परवानगी नाकारली आहे. मात्र, ३ जुलैपासून काही वारकरी आळंदीपासून पायी वारीला निघणार आहेत. एक दिवस या पायी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
पायी वारीत सहभागी होणार - गोपीचंद पडळकर - पंढरपूर पायी वारी बद्दल बातमी
३ जुलैपासून काही वारकरी आळंदीपासून पायी वारीला निघणार आहेत. गोपीचंद पडळकर यांनी पायी वारीत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मानाच्या 10 पालकांना एसटी बसच्या माध्यमातून पंढरपूरला जाण्याबाबत निर्णय -
राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी मानाच्या 10 पालकांना एसटी बसच्या माध्यमातून पंढरपूरला घेऊन जाण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारी सोहळा हा 2021च्या नियोजनाला राज्य मंत्रीमंडळात मान्यता दिली. महाविकास आघाडी सरकारने मानाच्या दहा पालख्यांना बसच्या माध्यमांने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. यामध्ये सुमारे चारशे वारकरी संप्रदायामधील महाराज मंडळींचा समावेश असणार आहे. एसटी बसने मानाच्या पालख्या वाखरीपर्यंत जाणार आहे. त्यानंतर नियमानुसार दीड किलोमीटरचे अंतर वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. याबाबतची नियमावलीचा आदेशात काढण्यात आला आला आहे.