पुणे- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. या टीकेवर उत्तर देताना राष्ट्रवादीने पडळकर आणि भाजपवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर यांची लायकी आहे का, तसचे इतक्या हीन दर्जाची टीका करण्याची भाजपची हीच संस्कृती आहे का, अशा सवाल राष्ट्रवादीने पडळकर आणि भाजपला केला आहे.
पडळकर यांची लायकी आहे का?... पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक - शरद पवारांवर टीका
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी हीन दर्जाची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. यानंतर राष्ट्रवादीकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी हीन दर्जाची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. यानंतर राष्ट्रवादीकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. राजकारणात टीका होत असते. मात्र, इतक्या खालच्या पातळीची टीका करत पडळकर यांनी त्यांची संस्कृती दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे.
या हीन टीकेबाबत जोपर्यंत पडळकर माफी मागत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केले जाणार असल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे. याच संदर्भात गुरुवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.