पुणे-कुख्यात गुंड निलेश बन्सीलाल घायवळ (वय ४४ ) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. निलेश घायवळ हा सराईत गुन्हेगार असून काही वर्षांपूर्वी त्याच्या टोळीने पुणे शहर आणि जिल्ह्यात उच्छाद मांडला होता. २०१७ झाली त्याच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. २०२० मध्ये तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता.
कुख्यात गुंड निलेश घायवळ गजाआड, स्थानबद्धतेची कारवाई - गुंड निलेश घायवळ लेटेस्ट न्यूज
काही वर्षांपूर्वी पुणे शहर आणि जिल्ह्यात मारणे आणि घायवळ टोळीची दहशत होती. सुरुवातीला एकत्र काम करणारे हे दोघेही २००३ मध्ये वेगळे झाले. यानंतर गजानन मारणे याच्या टोळीने २००९ साली निलेश घायवळ याच्यावर खुनी हल्ला केला होता. परंतु यामध्ये तो बचावला.
निलेश घायवळ याच्यावर खुनी हल्ला
काही वर्षांपूर्वी पुणे शहर आणि जिल्ह्यात मारणे आणि घायवळ टोळीची दहशत होती. सुरुवातीला एकत्र काम करणारे हे दोघेही २००३ मध्ये वेगळे झाले. यानंतर गजानन मारणे याच्या टोळीने २००९ साली निलेश घायवळ याच्यावर खुनी हल्ला केला होता. परंतु यामध्ये तो बचावला. त्यानंतर या दोन्ही टोळीतील वाद विकोपाला गेले आणि पुणे शहरात खुनाचे सत्र सुरू झाले. एकमेकांच्या साथीदारांवर दोघांनीही जीवघेणे हल्ले केले होते. यातूनच दोघांवरही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अनेक वर्षाच्या कालावधीनंतर दोघेही तुरुंगातून सुटून बाहेर आले होते.
खंडणीसाठी एकाचे अपहरण
निलेश घायवळ याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे १२ गुन्हे दाखल आहेत. कोथरुड पोलिसांनी त्याच्यावर २०१७ मध्ये मोक्कानुसार कारवाई केली. यात तो कारागृहात होता. पण २०२० मध्ये तो सुटून बाहेर आला. त्यानंतर कोथरुड पोलिसांनी त्याच्यावर दोन वर्षे हद्दपारीची कारवाई केली. यानंतर तो शहरातून बाहेर गेला. यानंतरही त्याने भिगवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणीसाठी एकाचे अपहरण केले होते. यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर भिगवण पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
जिल्ह्यातील १७ टोळ्यातील ७४ गुन्हेगार हद्दपार
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया करणाऱ्या तरुणीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मागील काही दिवसांपासून ग्रामीण पोलिसांनी सतरा टोळ्यांमधील ७४ भूमिहीनांना जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे तर ४ टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.