पुणे -आई गांजाची विक्री करते, अशी माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील एकावर गोळीबार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुदैवाने गोळी न लागल्याने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ७ ते ८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
गांजा विक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून टोळक्याचा एकावर गोळीबार - पुणे सिंहगड गोळीबार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी पवार याची आई गांजा विक्री करते, अशी माहिती पांडुरंग मोरे (४२) या व्यक्तीने पोलिसांना दिल्याचा समज बंटीला झाला. याच रागातून त्याने आपल्या साथीदारांकरवी पांडुरंग यांच्यावर गोळीबार केला. तसेच कोयत्याने वार करत दोन कारचे नुकसान केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी पवार याची आई गांजा विक्री करते, अशी माहिती पांडुरंग मोरे (४२) या व्यक्तीने पोलिसांना दिल्याचा समज बंटीला झाला. याच रागातून त्याने आपल्या साथीदारांकरवी पांडुरंग यांच्यावर गोळीबार केला. तसेच कोयत्याने वार करत दोन कारचे नुकसान केले. दरम्यान भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे सिंहगड रस्ता परिसरात काही काळ दहशत माजली होती. याप्रकरणी बंटी आणि त्याच्या साथीदाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, वारंवार घडणार्या अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.