महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

G 20 Conference : जी-20 परिषदेच्या निमित्ताने देशाची क्षमता दाखवण्याची चांगली संधी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil

जी-20 परिषदेच्या ( G 20 Conference ) निमित्ताने देशाची क्षमता दाखवण्याची चांगली संधी असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Guardian Minister Chandrakant Patil ) यांनी म्हटले आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. जी-20 परिषदेसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे विमानतळ ते सेनापती बापट रोडपर्यंत शहरातील चौक आणि प्रमुख रस्त्यांच्या सुशोभीकरणाची पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

G 20 Conference
पालकमंत्री चंद्रकांत पाटील

By

Published : Jan 9, 2023, 6:33 PM IST

Updated : Jan 9, 2023, 7:25 PM IST

जी-20 परिषद

पुणे - पुणे शहरात होणाऱ्या G-20 परिषदेसाठी पुणे विमानतळ ते सेनापती बापट मार्गापर्यंत ( Senapati Bapat Marg ) शहरातील चौक आणि प्रमुख रस्त्यांच्या सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी हिरवे पडदे लावण्यात येत असून रस्त्यांच्या मधोमध लावलेली झाडे तोडून तेथे कृत्रिम झाडे लावण्यात येणार आहेत. जी-20 परिषदेसाठी ( G 20 Conference ) करण्यात येत असलेल्या सुशोभिकरणावरून स्थानिक नागरिक, विरोधक प्रशासनावर टीका करत आहेत. तसेच ही आपल्या देशाच्या स्वाभिमानाची बाब असून विरोधकांनी सूचना देऊन टीका न करता संघटित व्हावे, असे निरीक्षण जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Guardian Minister Chandrakant Patil ) यांनी आज नोंदवले.

प्रमुख रस्त्यांच्या सुशोभीकरणाची पाहणी - जी-20 परिषदेसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे विमानतळ ते सेनापती बापट रोडपर्यंत शहरातील चौक आणि प्रमुख रस्त्यांच्या सुशोभीकरणाची पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. G-20 परिषदेच्या तयारीच्या संदर्भात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल जे. डब्ल्यू मॅरियट ( Hotel J. W Marriott ) येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.



परिषदेच्या तीन बैठका पुण्यात - जी-20 परिषद पुण्यात होणार आहे. या परिषदेच्या तीन बैठका जानेवारी आणि जूनमध्ये पुण्यात होणार आहेत. या बैठकीसाठी विविध देशांतील 137 हून अधिक प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेने शहराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. पुण्यातील चौक, विविध रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. जी-20 परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्रासह देशाला आपली क्षमता दाखवण्याची चांगली संधी मिळाली आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.



कडक सुरक्षा व्यावस्था राहणार - यावेळी पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, या परिषदेसाठी 37 देशांमधून 150 हून अधिक प्रतिनिधी येणार असल्याने सर्व सुरक्षा आणि शिष्टाचाराची काळजी घेतली जात आहे. पुणे, महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता आणि गुंतवणूक क्षमता पूर्ण क्षमतेने प्रदर्शित झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीबाबत संगणकीय सादरीकरण केले. या बैठकीसाठी भारत सरकारच्या निर्देशानुसार व समन्वयातून आवश्यक बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्यावतीने शहर सुशोभिकरणाचे काम कल्पकपणे करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पाहुण्यांचे स्वागत, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बैठकीनिमित्त देण्यात येणारी प्रतिकात्मक भेटवस्तू, स्मृतीचिन्हे, लावण्यात येणारे प्रदर्शन स्टॉल, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरुपाची भोजनव्यवस्था, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने भरडधान्याचे वैशिष्टपूर्ण खाद्यपदार्थ आदींबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

विविध प्रदर्शनाचे दालन - 'जी -२०' बैठक स्थळाशेजारी ५ प्रदर्शन दालने लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे महाननगरपालिकेकडून शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात सुरु असलेल्या कामांची माहिती असणारे दालन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराट्र आद्योगिक विकास महामंडळाचे महाराष्ट्र व पुण्याची औद्योगिक क्षमता प्रदर्शित करणारे दालन, भारतीय जनजातीय सहकारी विपनन विकास महासंघ (ट्रायफेड) आणि महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योगची उत्पादनांचा समावेश असलेले दालन तसेच महिला व बचत गटाची उत्पादने आणि सामाजिक वनीकरणांतर्गत बांबूपासून बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री दालन उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पाहुण्यांच्या स्वागतामध्ये सहभागी व्हा - पुणे विद्यापीठात १६ जानेवारी रोजी या पाहुण्यांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणेरी ढोल पथक, महाराष्ट्राचे मर्दानी खेळ, लावणी जुगलबंदी, शिववंदना, गणेशस्तुती तसेच गोंधळ आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. परिषदेच्या निमित्ताने पुणे,महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची, पुणे शहराची संस्कृती, येथील विकास दाखवण्याची चांगली संधी पुणे शहराला मिळाली असून शहरातील नागरिकांनी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या स्वागतामध्ये सहभागी व्हावे.अस यावेळी पाटील यांनी सांगितल आहे.

Last Updated : Jan 9, 2023, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details