पुणे - स्पाईस जेटच्या दुबईहुन आलेल्या विमानातील एका प्रवाशाजवळून १६ लाख रुपये किमतीचे ६६४ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. अब्दुर रहीम खातीर, असे या प्रवाशाचे नाव आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांना चुकवून हा प्रवासी बाहेर जाण्याच्या प्रयत्नात असताना सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाकडून १६ लाखाचे सोने जप्त
स्पाईस जेटच्या दुबईहुन आलेल्या विमानातील एका प्रवाशाजवळून १६ लाख रुपये किमतीचे ६६४ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.
सोमवारी सायंकाळी स्पाईस जेटचे विमान दुबईहुन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. या विमानातून प्रवासी अब्दुर बाहेर पडला. त्यानंतर तो सीमाशुल्कच्या अधिकाऱ्यांना चुकवून ग्रीन चॅनेलच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडण्याचा प्रयत्नात होता. दरम्यान, अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ ६६४ ग्रॅम सोने आढळले. याची किंमत १६ लाख ७१ हजार रूपये इतकी आहे.
अनधिकृतरित्या हे सोने जवळ बाळगल्यामुळे सीमाशुल्क विभागाच्या नियमानुसार ते जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.