पिंपरी - चिंचवड : सहा एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यातील शेलपिंपळगावात ही हृदय द्रावक घटना घडली. अनैतिक संबंधास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीच्या बाळाला जीवे मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विक्रम शरद कोळेकरच्या विरोधात चाकण पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
सव्वा वर्षीय बाळाला उकळत्या पाण्यात बुडवले : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल 2023 रोजी पुणे जिल्ह्यातील कोयाळी येथे राहणारा विक्रम शरद कोळेकर हा शेलपिंपळगाव येथे राहणाऱ्या प्रेयसीच्या घरी आला. दरम्यान प्रियकर आरोपी विक्रमने अवघ्या सव्वा वर्षीय बाळाला घेऊन बकेटित असलेल्या उकळत्या पाण्यात दोन्ही हात आणि पाय धरून बुडवले. यात बाळ गंभीर जखमी झाले. मोठमोठ्याने रडत होते ही सर्व घटना जन्मदात्या आईसमोर घडली.
बाळाचा पंधरा दिवसांनी मृत्यू :आरोपी विक्रमने प्रेयसीला जीवे ठार मारण्याची धमकी देत गळा आवळला तर बाळ का रडत आहे बघण्यासाठी आलेल्या प्रेयसीच्या बहिणीला देखील जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर तात्काळ बाळाला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. परंतु, तिथे उपचार न होऊ शकल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान बाळाचा पंधरा दिवसांनी मृत्यू झाला. याघटने प्रकरणी दोन दिवसांपूर्वी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी मोकाट असून त्याचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.
प्रेयसी आणि आरोपी प्रियकर यांचा वेगवेगळा विवाह :बाळाच्या आईचे आणि आरोपीचे प्रेम संबंध होते. परंतु बाळाची आई अनैतिक संबंध ठेवण्यास प्रियकराला विरोध करत होती. यातूनच त्याने बाळाला जीवे मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विक्रमचा विवाह झालेला आहे, त्यामुळे प्रेयसी विक्रमला टाळत होती. तू तुझ्या पत्नी सोबत रहा असे नेहमी सांगायची. तर, प्रेयसी तिच्या पतीपासून दुरावलेली आहे.
हेही वाचा :smuggling puppies and cat : मलेशियातून मांजराची तस्करी केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या नागरिकाला शिक्षा