पुणे - प्रियकराचा खून करून प्रेयसी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याची घटना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. महंतेश बिरादार (वय-27) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर प्रेयसी अनुराधा खरे (वय-25) हिला सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुण्यात प्रियकराचा खून करून प्रेयसी पोलीस ठाण्यात हजर - पुणे क्राईम न्यूज
पुण्यात तरुणीने प्रियकराचा खून करून पोलीस ठाण्यात हजर झाली. महंतेश बिरादार (वय-27) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर प्रेयसी अनुराधा खरे (वय-25) हिला सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्रातिनिधीक छायाचित्र
हेही वाचा -अहमदनगर पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन अज्ञात पोलिसांसह दहा जणांवर गुन्हा दाखल
अनुराधा खरे ही मंगळवारी पहाटे रक्ताने माखलेल्या हाताने सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये आली. तिने खून केला असल्याचे पोलिसांना सांगितले. या सर्व प्रकाराने पोलीस ठाण्यामध्येही काही काळ गोंधळ उडाला. पोलिसांनी अनुराधाला ताब्यात घेतले आहे. तिने केलेल्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Last Updated : Mar 3, 2020, 1:16 PM IST