पुणे- आईसोबत भांडण झाल्यामुळे घर सोडून निघून गेलेल्या 19 वर्षीय तरुणीला मदत करण्याच्या बहाण्याने एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला आहे. पुण्यातील घोरपडी रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञात तरुणाविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आईसोबत भांडण करुन घर सोडलेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार - तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठेत राहणाऱ्या पीडित तरुणीचे बुधवारी सायंकाळी आईसोबत भांडण झाले होते. याच रागातून तिने घर सोडले आणि पुणे रेल्वे स्टेशनवर जाऊन बंगळूरला जाणाऱ्या रेल्वेत बसली. परंतु, तिच्याजवळ तिकीट नसल्यामुळे टीसीने तिला कराड रेल्वे स्टेशनवर उतरविले.
हेही वाचा-पुणे कॉसमॉस बँक प्रकरण: आतापर्यंत १८ जणांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठेत राहणाऱ्या पीडित तरुणीचे बुधवारी सायंकाळी आईसोबत भांडण झाले होते. याच रागातून तिने घर सोडले आणि पुणे रेल्वे स्टेशनवर जाऊन बंगळूरला जाणाऱ्या रेल्वेत बसली. परंतु, तिच्याजवळ तिकीट नसल्यामुळे टीसीने तिला कराड रेल्वे स्टेशनवर उतरविले. तिथून ती पॅसेंजरने परत पुणे रेल्वे स्टेशनवर आली. या प्रवासात तिला एक तरुण भेटला. ते दोघेही घोरपडी रेल्वे स्थानकात उतरले. या तरुणाने तिला घरी सोडतो असे सांगून रिक्षाने एका रुममध्ये नेले आणि बलात्कार केला. त्यानंतर तिला घोरपडी रेल्वे स्टेशनवरील रिक्षा स्टॅन्डवर सोडले आणि पळ काढला. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेतील या तरुणीने वानवडी पोलिसात फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.