पुणे- प्रेयसीचे दुसऱ्याच तरुणाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने तिची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर प्रियकर फरार झाला आहे. ही घटना पुण्याच्या चंदननगर परिसरात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. मीना पटेल (वय २२), असे मृत तरुणीचे नाव आहे. तर खून करून फरार झालेल्या प्रियकरचे नाव किरण अशोक शिंदे (वय २५) असे आहे.
पुणे : दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या, प्रियकर फरार - murder
गेल्या एक वर्षापासून संबंधितांत प्रेमसंबंध होते. पण मागील सहा महिन्यांपासून त्यांच्यात वाद निर्माण होत होते. आपल्या प्रेयसीचे दुसऱ्याच कुणाशी तरी सूत जुळले असावे, असा संशय त्याला होता. त्यावरून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते.
चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती, पण मागील एक महिन्यापासून ती घरीच होती. तर मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असून काळेवाडी परिसरात रहात होता. मागील एक वर्षांपासून दोघात प्रेमसंबंध होते. पण मागील सहा महिन्यांपासून त्यांच्यात वाद निर्माण होत होते. आपल्या प्रेयसीचे दुसऱ्याच कुणाशी तरी सूत जुळले असावे, असा संशय त्याला होता. त्यावरून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते.
दरम्यान मंगळवारी रात्रीही दोघे चंदननगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ भेटले. यावेळी त्यांच्यात परत वाद झाला. आरोपी किरण शिंदे याने रागाच्या भरात मीना पटेल हिच्या पोटावर चाकूने वार केले आणि पळ काढला. जखमी अवस्थेत मीना पटेल हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.