घुंगरू चित्रपट आणि मराठा आरक्षणाविषयी बोलताना गौतमी पाटील पुणेGautami Patil On Maratha Reservation :मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत विचारलं असता लावणी कलावंत गौतमी पाटील हिने आपल्याला या विषयात ओढूच नका, असं आर्जवच केलं. येत्या 15 डिसेंबरला तिचा 'घुंगरू' हा चित्रपट येतोय. (Gautami Patil Movie Ghungru) डीजे लावणीच्या कार्यक्रमानंतर आता तिने चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकलंय. स्वत:च्या पहिल्या चित्रपटाबद्दल ती प्रचंड आशावादी आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबाबत विचारलं असता तिनं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं मत मांडलं.
गौतमीचा हा पहिलाच चित्रपट :यावेळी गौतमी पाटील म्हणाली की, ''हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मला जसा अभिनय जमला तसा मी केला. माझी सर्वांना विनंती आहे की, त्यांनी हा चित्रपट बघायला जावं. कलाकारांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. कलावंतांच्या भविष्याचं काय? हा प्रश्नच चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पुढं मांडला असल्याचं यावेळी तिनं सांगितलं.''
'त्या' पुढे जात असतील तर चांगलंच :गौतमी पाटील हिच्या बरोबरचे अनेक कलाकार तिला सोडून वेगळे कार्यक्रम घेत आहेत. यावर गौतमी पाटील हिला विचारलं असता ती म्हणाली की, ''मला या क्षेत्रात अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. माझ्या हाताखाली अनेक मुली तयार झाल्या आहेत. जर त्यांचं नाव झालं असेल आणि त्या पुढे जात असतील तर चांगलंच आहे.''
मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा : राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांना दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत आहे. दुसरीकडं राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील, तसंच ओबीसी नेता मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. त्यातच जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानं नव्या वादाला सुरुवात झाली.
हेही वाचा:
- आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता, लूकआऊट नोटीस जारी करावी-नितेश राणे यांची मागणी
- 'उपमुख्यंत्री म्हणून अजित पवारांनी काय दिवे लावले, पीएचडी करणं पक्ष बदलण्याइतकं सोपं नाही'
- लातूरच्या अमोल शिंदेची संसदेबाहेर घोषणाबाजी, शेतमजूर म्हणून करतो काम