महाराष्ट्र

maharashtra

गौतम नवलखाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण ११ नोव्हेंबरला संपले. त्यानंतर त्याने अटकपूर्व जामीनासाठी पुणे जिल्हा न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा फेटाळून लावला आहे.

By

Published : Nov 13, 2019, 7:51 AM IST

Published : Nov 13, 2019, 7:51 AM IST

गौतम नवलखा

पुणे - एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलखाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळून लावला. न्यायालयाने अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिल्याने नवलाखाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.


एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणी नवलाखाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण ११ नोव्हेंबरला संपले. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुणे जिल्हा न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला. नवलाखाच्या अर्जावर सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पुर्ण झाल्यानंतर, याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. नवलखाच्या अर्जावरील निकाल देईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले होते. मात्र, मंगळवारी न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यामुळे अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या सत्ताकारणासाठी किमान समान कार्यक्रमाचा झांगडगुत्ता?


नवलखा यांच्यावतीने अ‍ॅड. रागिणी आहुजा यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी पुन्हा तीन दिवसांचे अंतरिम संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केला. यापूर्वी भीमा कोरेगाव प्रकरणातील आनंद तेलतुंबडेला अशा प्रकारचे संरक्षण देण्यात आले आहे, असा युक्तिवाद आहुजा यांनी केला. त्याला सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला. नवलाखावर दीडवर्षापूर्वी नक्षलवादी संघटनेच्या सदस्यांशी संबंध असल्या कारणाने गुन्हा दाखल केलेले आहे.

हेही वाचा - 'राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे दुर्दैवी.. स्थिर सरकार मिळेल, ही अपेक्षा'


त्याच्याविरोधात पोलिसांना प्रथमदर्शनी सबळ पुरावे मिळाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास होणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत नवलाखाला वेळोवेळी न्यायालयाने अटकपूर्व संरक्षण दिलेले आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्यात यावा, असा पठारे यांनी सांगितले. याप्रकरणी बचाव पक्षाच्या वकीलांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details